टेरेन्सने नोरा फतेहीसोबत केले गैरवर्तन?

मलायका अरोराला करोनाची लागण होताच ती परिक्षक म्हणून काम करत असलेल्या ‘इंडियाज बेस्ट डान्सर’ शोमध्ये नोरा फतेहीची एण्ट्री झाली. नोरा शोमध्ये परिक्षक कोरिओग्राफर गीता कपूर आणि टेरेन्स लुईससोबत मजा मस्ती करताना दिसत होती. पण सध्या एका वेगळ्या कारणासाठी नोरा चर्चेत आहे.

सध्या सोशल मीडियावर शोमधील एक व्हिडीओ तुफान व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये टेरेन्स नोरासोबत गैरवर्तन करताना दिसत आहे. हा व्हिडीओ खरा आहे की खोटा हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. पण व्हिडीओ पाहून चाहत्यांनी टेरेन्सला सुनावले आहे.

एका यूजरने ‘टेरेन्सकडून हे अपेक्षित नाही’ असे म्हटले आहे. तर दुसऱ्या एका यूजरने ‘हा टेरेन्स आहे?’ असे म्हटले आहे. पण अद्याप टेरेन्स किंवा नोराने यावर प्रतिक्रिया दिलेली नाही.

You might also like