‘असल तो सिद्दी तर आम्हीबी हाय जिद्दी’; पाहा, अंगावर काटा आणणारा ‘जंगजौहर’चा टीझर

गेल्या ३ महिन्यांपासून कोरोनाने राज्याला विळखा घातला आहे. आता कुठे सुरु असलेला लॉकडोउन थोडा शिथिल करण्याचा प्रयत्न होत आहे. अनलॉकडाऊनमध्ये प्रत्येक क्षेत्र हळूहळू खुले होत आहे. मनोरंजन क्षेत्रानेही पुन:श्च हरिओम केले आहे. नियमांचे पालन करत टीव्ही मालिका आणि सिनेमांची शूटिंग सुरू झाली आहे. नुकतेच ‘जंगजौहर’ या चित्रपटाचा टीझर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.

लॉकडाऊनमुळे सलमान खानवर आली शेतात राबायची वेळ 

अभिनेता ऋषी सक्सेनाने त्याच्या इन्स्टाग्रामवर हा टीझर शेअर केला आहे. प्रदर्शित झालेल्या टीझरमध्ये अंगावर काटा आणणारी अनेक दृश्य असल्याचं पाहायला मिळत आहे. पन्हाळगडाला सिद्दी मसूदने वेढा दिला, तेव्हा छत्रपती शिवाजीराजे यांनी मोठ्या शिताफीने स्वत:ची सुटका करुन घेऊन विशालगडाकडे कूच केली. पाठलागावर असलेल्या विजापुरी सैन्याचा धोका लक्षात घेत बाजीप्रभूंनी महाराजांना पुढे जाण्यास सांगितले.

आता ‘या’ प्रसिद्ध बॉलिवूड दिग्दर्शिकेचा बंगला केला सील 

बाजी व फुलाजी हे दोन्ही बंधू बांदल सेनेसह घोडखिंडीत सिद्धीच्या सैन्याविरोधात महाकाळ म्हणून उभे ठाकले. हजारोंच्या सैन्याचा मुकाबला करताना बाजी आणि बांदल सेनेच्या वीरांनी पराक्रमाची शिकस्त करत महाराज विशालगडावर पोहचेपर्यंत घोडखिंड प्राणप्रणाने लढवली. याची एक झलक या टीझरमध्ये दाखविण्यात आली आहे.

दरम्यान, या चित्रपटाचं दिग्दर्शन दिग्पाल लांजेकर करत असून अजय-अनिरुद्ध आरेकर हे निर्मिती करत आहे. अभिनेता चिन्मय मांडलेकर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या भूमिकेत झळकणार आहे. विशेष म्हणजे या चित्रपटात अनेक दिग्गज कलाकार झळकणार आहेत.

View this post on Instagram

"असंल तो सिद्दी तर आम्हीबी हाय जिद्दी स्वराज्यासाठी वार झेलू निधड्या छातीवरती !!" स्वराज्याच्या इतिहासातल्या दैदीप्यमान त्याग आणि बलिदान पर्वाची ही झलक, महाराष्ट्रचरणी अर्पित करीत आहोत 'जंगजौहर'चा टीझर… #जंगजौहर #JungJauhar #JungJauharTeaser #AAFilms In Association with @almondscreations Written and Directed By : @digpalofficial Produced By : @ajayarekarofficial #AniruddhaArekar

A post shared by Rishi Saxena (@rishi_saxena_official) on

 

You might also like