तापसी पन्नू लवकरच झळकणार ‘या’ चित्रपटात

लवकरच तापसी पन्नू दिग्दर्शक अनुराग कश्यपच्या ‘मनमर्जिया’ आणि ‘सांड की ऑंख’ या चित्रपटात मुख्य भूमिकेत दिसणार आहे. त्यानंतर तापसी अनुरागच्या आणखी एका चित्रपटात काम करणार आहे. हा चित्रपट एक भयपट असून यामध्ये आता पर्यंत भारतात कधी न दाखवलेले दृश्य पाहायला मिळणार असल्याचे म्हटले जात आहे.

‘सांड की ऑंख’ या चित्रपटातील प्रकाशी तोमरच्या भूमिकेसाठी तापसीला विशेष मेकअप करावा लागला होता. परंतु या भयपटामध्ये तापसीचा वेगळा मेकअप करण्यात येणार नसल्याचे तापसीने सांगली आहे.

‘मनमर्जिया’ चित्रपटासाठी तापसीच्या केसांचा रंग बदलण्यात आला होता. आता या आगमी चित्रपटात तापसी काय वेगळं करणार असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे. या चित्रपटाचे चित्रीकरण परदेशात होणार असल्याचे म्हटले जात आहे.

You might also like