तापसी पन्नू झळकणार ‘या’ बायोपिकमध्ये

अभिनेत्री तापसी पन्नू लवकरच एका बायॉपिक चित्रपटात झळकणार आहे. या चित्रपटाचे शूटिंग नोव्हेंबरपासून करण्यात येणार आहे. हा चित्रपट सुरुवात रश्‍मी रॉकेट एका गावकरी तरुणीच्या जीवनावर आधारित आहे. जिच्याकडे, वेगवान धावण्याची शक्‍ती आहे. ती एक अविश्‍वसनीय वेगवान धावपटू आहे आणि त्यामुळे गाववाले तिला “रॉकेट’ म्हणूनच ओळखतात.

आपल्या भूमिकेविषयी तापसी म्हणाली की, मी या प्रॉजेक्‍टमध्ये अगदी सुरुवातीपासून सहभागी आहे आणि त्यासाठी हे सर्व माझ्यासाठी खास आहे. करोनाच्या अगदी आधी, मी एका स्प्रिंटरच्या व्यक्‍तिरेखेत उतरण्यासाठी 3 महिन्यांपासून ट्रेनिंग घेत होते. हा एक मोठा ब्रेक झाला आहे. मात्र या विषयामुळे पुन्हा एकदा याची सुरुवात करायला उत्सुक आहे ज्याची सुरुवात ट्रेनिंगने होईल, असे तिने सांगितले.

दरम्यान, देव डी, लुटेरा, क्वीन, केदारनाथ सारख्या चित्रपटांचे संगीतकार अमित त्रिवेदी आता “रश्‍मी रॉकेट’मध्ये आपल्या संगीताने रंग भरणार आहेत. नेहा आनंद आणि प्रांजल खंडाड़िया यांच्यासोबत रॉनी स्क्रूवाला यांची निर्मिती असलेला “रश्‍मि रॉकेट’ 2021 मध्ये प्रदर्शित होण्यासाठी सज्ज होईल. अभिनेत्री तापसीसोबत या चित्रपटात “एक्‍सट्रैक्‍शन’ फेम प्रियांशु पेंथुली प्रमुख भूमिकेत दिसणार आहे.

You might also like