‘तनू वेड्स मनू’चा तिसरा भागही लवकरच येणार….!

कंगना रणौत आणि आर माधवन यांचा ‘तनू वेड्स मनू’चा तिसरा भाग लवकरच आपल्या भेटीला येणार आहे. कंगनानं स्वत: या वृत्ताला दुजोरा दिला आहे. चार वर्षांनंतर चित्रपटाचा तिसरा भाग येणार आहे. ‘मणिकर्णिका’ प्रदर्शित झाल्यानंतर ‘तनू वेड्स मनू ३’ ची औपचारिक घोषणा करण्यात येईल असं कंगनानं सांगितलं आहे.

‘मुंबई मिरर’ला दिलेल्या मुलाखतीत ‘तनू वेड्स मनू ३’ येणार असल्याची माहिती दिली आहे. दिग्दर्शक आनंद राय यासंदर्भात लवकरच औपचारिक घोषणा करतील असंही कंगना म्हणाली. गेल्या वर्षभरात कंगना ‘मणिकर्णिका’च्या तर आनंद राय ‘झिरो’च्या चित्रीकरणात व्यग्र होते. त्यामुळे चित्रपटासंबधीत कोणत्याही चर्चा झाल्या नाहीत मात्र लवकरच तिसऱ्या भागाच्या स्क्रिप्टवर काम सुरू होईल अशीही माहिती कंगनानं दिली.

महत्वाच्या बातम्या –

 

You might also like