‘तनू वेड्स मनू 3’ मध्ये कंगना दिसणार नाही

मुंबई, दि. 13 – सध्या रंगून चित्रपटाच्या ट्रेलरमुळे चर्चेत असलेल्या अभिनेत्री कंगना रानौत आणि तिच्या चाहत्यांसाठी एक वाईट बातमी आहे. ‘तनू वेड्स मनू 3’ मधून कंगनाचा पत्ता कट झाला असून चित्रपटात ती दिसणार नाही असं कळत आहे. ‘तनू वेड्स मनू’ चित्रपटातील भूमिकांसाठी कंगनाचं सर्वांनीच कौतुक केलं होतं. या चित्रपटांमुळे तिला चांगलीच प्रसिद्धी मिळाली होती. त्यामुळे कंगना चित्रपटात नसल्याने चाहत्यांनी निराशा होईल एवढं नक्की.
‘तनू वेड्स मनू’ मालिकेतील तिस-या चित्रपटाच्या तयारीला सुरुवात झाली आहे. ‘तनू वेड्स मनू’ आणि त्याच्या सिक्वेलमध्ये कंगनाने मुख्य भूमिका निभावली होती. पण ‘तनू वेड्स मनू 3’ मध्ये कंगना दिसणार नाही. कंगनाच्या जागी दुस-या अभिनेत्रीला मुख्य भूमिकेसाठी कास्ट करण्याचा विचार सध्या चालू आहे.
या चित्रपटाचं दिग्दर्शन आनंद राय करणार नसून त्यांच्या जागी दोन्ही चित्रपटांचं स्क्रिप्टिंग करणारे हिमांशू शर्मा करणार आहे. हिमांशू यांची चित्रपटाची कथा लिहिण्यास सुरुवात केली आहे. हिमांशू यांनी दिलेल्या सल्ल्यानंतरच कंगनाचा पत्ता कट झाला असल्याचं सांगण्यात येत आहे. 2017 मध्ये कंगना चित्रपटात नसल्याची अधिकृत घोषणा होण्याची शक्यता आहे.
You might also like