एक नजर ‘उरी : द सर्जिकल स्ट्राइक’च्या बॉक्स ऑफिस कलेक्शनवर

विकी कौशलची मुख्य भूमिका असलेला ‘उरी : द सर्जिकल स्ट्राइक’ हा चित्रपट नवीन वर्षातील सुपरहिट चित्रपट ठरला आहे. अवघ्या १० दिवसांमध्ये या चित्रपटाने बॉक्स ऑफीसवर तब्बल १०० कोटींपेक्षा अधिक रुपयांचा गल्ला जमवला आहे. विकी कौशलच्या करिअरमधील हा सर्वांत महत्त्वपूर्ण चित्रपट ठरल्याचं म्हणता येईल. चित्रपट व्यापार विश्लेषक तरण आदर्श यांनी ट्विट करत या चित्रपटाच्या कमाईची आकडेवारी जाहीर केली आहे.

या चित्रपटाने काही दिवसातच थेट १०० कोटींचा टप्पा पार केल्यामुळे साऱ्यांच्याच नजरा उंचावल्या आहेत.‘उरी : द सर्जिकल स्ट्राइक’ या चित्रपटाचं २५ कोटी रुपयांचं बजेट होतं. मात्र या चित्रपटाने अवघ्या तीन ते चार दिवसांमध्ये बजेटच्या रकमेची वसुली केली होती.

२०१६ मध्ये भारतीय सैन्यदलाने पाकव्याप्त काश्मीरमध्ये जात सर्जिकल स्ट्राईक करत शेजारी राष्ट्राकडून होणाऱ्या दहशतवादी कारवायांना सडेतोड उत्तर दिलं होतं. भारताने या हल्ल्याचे चोख उत्तर सर्जिकल स्ट्राइकने देत पाकिस्तानला चांगला धडा शिकवला होता. याच हल्ल्यावर आधारित ‘उरी’ हा चित्रपट असून पुढील काही दिवसामध्ये कमाईचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे.

महत्वाच्या बातम्या –

 

 

You might also like