…..म्हणून तब्बू करत नाहीये भारत चित्रपटाचे प्रमोशन

तब्बूचा दे दे प्यार दे हा चित्रपट आज प्रदर्शित झाला असून या चित्रपटात तिच्यासोबतच अजय देवगण आणि रकुल प्रीत सिंह मुख्य भूमिकेत आहे. या चित्रपटाचे सध्या जोरदार प्रमोशन तब्बू आणि या चित्रपटाची टीम करत आहे.

त्याचसोबत तिचा भारत हा चित्रपट पुढच्या महिन्यात प्रदर्शित होत आहे. या चित्रपटाच्या प्रमोशनपासून तब्बू दूरच असल्याचे पाहायला मिळत आहे. तब्बू या चित्रपटाचे प्रमोशन का करत नाही याविषयी तिने नुकतेच एका मुलाखतीत सांगितले आहे.

भारत या चित्रपटामध्ये माझी भूमिका खूपच छोटी आहे. या चित्रपटातील केवळ एकाच दृश्यात मी दिसणार आहे. त्यामुळे याबाबत मी काय बोलणार… म्हणूनच मी या चित्रपटाच्या कोणत्याही प्रमोशनल इव्हेंटमध्ये सहभागी होणार नाहीये.

 

 

You might also like