तब्बू-ईशान खट्टरचा ‘अ सूटेबल बॉय’ टोरंटो इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवलमध्ये

टोरंटो आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव २०२० मध्ये तब्बू आणि ईशान खट्टर अभिनीत ‘ए सुवेबल बॉय’ प्रदर्शित होणार आहे.

बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री असलेली तब्बू पदार्पणापासूनच जबरदस्त लुक आणि अभिनय कौशल्यांमुळे प्रगती पथावर राहिली आहे. आता तब्बूच्या सौंदर्याची आणि कौशल्यांची ओळख जागतिक स्तरावर होणार आहे. टोरांटो आंतरराष्ट्रीय चित्रपट महोस्तव २०२० मध्ये ‘अ सूटेबल बॉय’ प्रदर्शित होणार असून यामध्ये तब्बू सोबत नवखा ईशान खट्टर देखील झळकणार आहे.

विक्रम सेठच्या ‘अ सुवेट बॉय’ चे बीबीसी रूपांतर युनायटेड किंगडममध्ये प्रसारित होणार असून हे अँड्र्यूज डेव्हिस लिखित सहा भागांचे प्रोडक्शन आहे. यात तब्बू, ईशान, तान्या माणिकताला, रसिका दुगल आदींचा समावेश आहे.

You might also like