शाहिद कपूरच्या ‘कबीर सिंग’ चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित

शाहिद कपूर ‘कबीर सिंग’मध्ये दिसणार आहे. सुप्रसिद्ध दाक्षिणात्य चित्रपट ‘अर्जुन रेड्डी’चा हा हिंदी रिमेक आहे. ‘अर्जुन रेड्डी’ हा चित्रपट दक्षिणीकडे तुफान गाजला होता. त्यामुळे हिंदी रिमेकची प्रेक्षकांमध्ये फार उत्सुकता आहे. या चित्रपटाचा नुकताच ट्रेलर प्रदर्शित झाला आहे.
ट्रेलरमध्ये अर्जुन रेड्डीची मुख्य भूमिका साकारणारा विजय देवरकोंडा आणि कबीर सिंगच्या लूकमधील शाहिद कपूर हुबेहूब दिसत आहे. या चित्रपटात शाहिद वैद्यकिय शाखेतील विद्यार्थ्याच्या भूमिकेत दिसत आहे. तसेच कॉलेजमध्ये शिकत असताना शाहिद कियारा उर्फ प्रीतीच्या प्रेमात पडतो. परंतु प्रेयसी सोडून गेल्यानंतर व्यसनाधीन झालेल्या अँग्री यंग मॅन, कबीर सिंगची भूमिका लक्षवेधी ठरली आहे. हा चित्रपट २१ जून २०१९ ला प्रदर्शित होत आहे.