‘मोगरा फुलला’ चित्रपटाचा टिझर प्रदर्शित

स्वप्नील जोशीची मुख्य भूमिका असलेला मराठी चित्रपट ‘मोगरा फुलला’ १४ जून रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे. स्वप्निल जोशी आता एकदम नव्या लूकमध्ये या चित्रपटात प्रेक्षकांसमोर येणार आहे.

स्वप्निल जोशीच्या नव्या अवतारामुळे या चित्रपटाबद्दलची प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. ओळखीच्या चेहऱ्याची पुन्हा नव्याने ओळख या चित्रपटात प्रेक्षकांना बघायला मिळणार आहे.

‘मोगरा फुलला’ सिनेमाचा टिझर नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या टिझर मध्ये स्वप्नील जोशी वेगळ्या भूमिकेत दिसत आहे.

 

You might also like