सुयशच्या बुमरँग या वेबसिरिजला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद….

सुयशच्या बुमरँग या वेबसिरिजची सध्या चांगलीच चर्चा आहे. फिल्मबाझ फिल्मची ही वेबसिरिज प्रेक्षकांना सध्या युट्युबला पाहायला मिळत आहे. ही हॉरर आणि सस्पेन्स बाजाची वेबसिरिज असून या वेबसिरिजला प्रेक्षकांचा खूपच चांगला प्रतिसाद मिळत आहे.
या वेबसिरिजचा पहिला भाग प्रेक्षकांच्या नुकताच भेटीस आला असून हा पहिला भाग साडे नऊ हजाराहून अधिक लोकांना आतापर्यंत पाहिला आहे. बुमरँगमध्ये सुयशसोबतच ओमकार बोरकर, सिद्धेश नागवेकर, शुभम देसाई, मिलिंद जाधव, आनंद शिंदे, सीमा कुलकर्णी, राजेंद्र खेडेकर, पूजा चांदेकर, रक्षदा रणदिवे यांच्या मुख्य भूमिका आहेत.
या वेबसिरजचे दिग्दर्शन कुणाल राणेने केले असून लेखन अक्षय टेमकरचे आहे. या वेबसिरिजच्या पहिल्या भागामुळे प्रेक्षकांची उत्सुकता चांगलीच ताणली गेली असून याचा दुसरा भाग कधी येणार आहे याची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहात आहेत.