सुशांतची आत्महत्या मोठे षडयंत्र, विखेंचा सरकारला सवाल

सुशांत सिंग राजपूतने 14 जून रोजी  मुंबईतील आपल्या राहत्या घरी गळफास लावून या आत्महत्या  केली. त्याचे निधन जितके दुःखदायक होते, तितकेच ते धक्कादायकही होते. सुशांतच्या फॅन्सच्या मते ही आत्महत्या नसून इंडस्ट्री मधील लोकांच्या दबावाखाली येऊन झालेला खून आहे असे म्हंटले जातेय. अद्याप सुशांतने आत्महत्या नेमकी का केली याचा तपास पोलीस करत आहेत.

आयपीएस विनय तिवारी क्वारंटाइनमुक्त, बिहारला जाणार परत

आत्तापर्यंत 30 हून अधिक लोकांची चौकशी पोलिसांनी केली आहे. आणखी आरोपांची चौकशी करण्यासाठी बिहार पोलिसांनी पाटणा शहर एसपी विनय तिवारी यांच्या अध्यक्षतेखालील चार सदस्यांची टीम मुंबईला पाठवली आहे. तसेच, आता या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे देण्यास मान्यता मिळाली आहे.

दरम्यान, आता सुशांतच्या या प्रकरणात भाजप खासदार डॉ. सुजय विखे यांनी देखील उडी मारली आहे. विखे म्हणाले कि, “सुशांत प्रकरणात भरपूर गोष्टी पुढे यायच्या आहेत. या प्रकरणातील जी मुख्य आरोपी आहे, ती खरचं भारतात आहे का, अशी शंका उपस्थित होतेय. या प्रकरणाचा सीबीआयकडे तपास गेल्यानंतर काय वास्तविकता आहे, ती समोर येईल.

पण संबंधित अभिनेत्रीचा फक्त वकिल बोलतोय. त्या कुठे दिसत नाही? यामध्ये किती मोठे षडयंत्र असू शकते? हे सीबीआयच्या माध्यमातून जनतेसमोर येईल.’ असं डॉ. सुजय विखे म्हणाले, ते अहमदनगर मध्ये बोलत होते.

राणा – मिहीकाचा असा पार पडला हळदीसोहळा

पुढे म्हणाले, आयपीएस अधिकाऱ्यांना क्वारंटाईन करणे, ही अतिशय गंभीर बाब आहे. मुळात यापूर्वी आलेल्या पोलिसांना क्वारंटाईन केलं नाही, पण आयपीएस अधिकाऱ्याला केलं. याचं कारण काय? असा सवाल देखील यावेळी सुजय विखे यांनी सरकारला केला.

 

You might also like