सुशांतच्या आत्महत्येप्रकरणी ‘या’ दिग्दर्शकावर होणार पोलिसांकडून चौकशी

सुशांत सिंह राजपूतने १४ जून रोजी मुंबईतल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. त्याच्या आत्महत्येचं नेमकं कारण अद्याप अस्पष्ट आहे. मात्र गेल्या सहा महिन्यांपासून तो नैराश्यात होता, असं म्हटलं जातंय.त्याच्या आत्महत्येनंतर बॉलिवूडमधल्या घराणेशाहीवरून वाद सुरू झाला आहे.
सुशांतच्या आत्महत्येप्रकरणी दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांची मुंबई पोलिसांकडून चौकशी होणार असल्याची माहिती समोर येत आहे. पोलिसांसमोर हजर राहण्यासाठी भन्साळींना पुढील एक-दोन दिवसांत समन्स बजावण्यात येणार आहे.
अभिनेत्री सायली संजीव शिकतेय हे वाद्य