‘या’ चित्रपटातून उलगडणार सुशांतचा जीवन प्रवास

‘सुशांत सिंह राजपूत’ने आत्महत्या करून एक महिना पूर्ण झाला आहे. त्याचे निधन जितके दुःखदायक होते, तितकेच ते धक्कादायकही होते. सुशांतच्या फॅन्सच्या मते ही आत्महत्या नसून इंडस्ट्री मधील लोकांच्या दबावाखाली येऊन झालेला खून आहे असे म्हंटले जातेय.

अद्याप सुशांतने आत्महत्या नेमकी का केली याचा तपास पोलीस करत आहेत. आत्तापर्यंत 30 हून अधिक लोकांची चौकशी पोलिसांनी केली आहे. हे सुरू असतानाच सुशांतवरच्या चित्रपटाची घोषणा करण्यात आली आहे. “सुसाईड ऑर मर्डर” असं या चित्रपटाचं नाव आहे.

 

विजय शेखर गुप्ता यांचा हा चित्रपट आहे. टिकटॉक स्टार ‘सचिन तिवारी’ चित्रपटात सुशांतची भूमिका साकारणार आहे. ‘सुसाईड ऑर मर्डर’ या चित्रपटाचे ऑफिशल पोस्टर्स प्रदर्शित करण्यात आले.  इंडस्ट्रीच्या बाहेरून आलेल्या एका कलाकाराची कहाणी मांडण्यासाठी आता एका आऊटसायडर ची निवड करण्यात आली. 16 सप्टेंबरपासून या चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरूवात करण्यात येणार आहे अशी माहितक देण्यात आली आहे.

 

 

You might also like