संजय राऊत यांच्या आरोपावर सुशांतच्या कुटुंबीय म्हणाले…

अभिनेता सुशांत सिंग राजपूत याच्या कथित आत्महत्येनंतर राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. भाजपतर्फे आता या प्रकरणी शिवसेना खासदार संजय राऊत यांनी शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या सामना वृत्तपत्रात प्रकाशिक केलेल्या लेखातून हा दावा केला आहे.

सुशांत सिंह राजपूतचे त्यांचा वडिलांशी के. के. सिंह यांच्यातील नाते संबंध घनिष्ट नव्हतं. मात्र याच विधानावर सुशांतच्या कुटंबियांनी संजय राऊत यांनी केलेल्या सर्व आरोपांचं खंडन केलं आहे.

दरम्यान,’संजय राऊत खोटं बोलत आहेत.सुशांतच्या वडिलांचं एकच लग्न झालं आहे, त्यानी दुसरं लग्न केलंच नाही. सर्व चुकीच्या गोष्टींना लपवण्यासाठी चुकीचे आरोप केले जात आहेत.’असं म्हणत सुशांतच्या कुटंबियांनी सर्व आरोपाचे खंडन केले आहे.

तत्पूर्वी संजय राऊत यांनी सामनाच्या रोखठोक सद्रामधून सुशांत सिंह राजपूत प्रकरणावर भाष्य केलं होत. यामध्ये त्यांनी,बिहार पोलीस आणि केंद्राने महाराष्ट्र सरकारविरुद्ध कट रचल्याचा आरोप केला होता.

“सुशांत सिंग राजपूत प्रकरणात बिहार सरकारला पडायचे कारण नव्हते. सुशांतचे वडील पाटण्यात राहतात. त्याच्या वडिलांशी त्याचे संबंध चांगले नव्हते. वडिलांनी केलेले दुसरे लग्न सुशांतला मान्य नव्हते. याच वडिलांना फूस लावून बिहारमध्ये एक एफआयआर दाखल करायला लावला गेला व मुंबईत घडलेल्या गुन्ह्याचा तपास करायला बिहारचे पोलीस मुंबईला आले.

You might also like