सुशांत जर जिवंत असता तर तोही तुरुंगात असता का? तापसी पन्नूचा जहरी सवाल

आपल्या बेधडक वक्तव्यांसाठी प्रसिद्ध असलेली बॉलिवूड अभिनेत्री तापसी पन्नू हिने रिया चक्रवर्तीच्या अटकेनंतर पुन्हा खळबळ उडवून देणारं ट्वीट केलं आहे. “अभिनेता सुशांत सिंह राजपूत जर जिवंत असता, तर तोही तुरुंगात असता का?” असा सवाल तापसीने ड्रग्ज कनेक्शनच्या अनुषंगाने उपस्थित केला.

रियाच्या समर्थनात उतरलेल्या बॉलिवूडच्या फळीमध्ये तापसी पन्नूचाही समावेश आहे. रियाने ड्रग्ज घेतल्याचा उल्लेख एनसीबीच्या रेकॉर्डवर नसल्याच्या बातमीचे ट्वीट ‘कोट’ करुन तापसीने आपले मत मांडले आहे.

“करेक्शन. ती (ड्रग्जचे) सेवन करत नव्हती. सुशांतसाठी फायनान्सिंग करत होती. म्हणजे, जर सुशांत जिवंत असता तर तो तुरुंगात असता? अरे नाही! त्याला ड्रग्ज घेण्यासाठी बळजबरी केली असेल. सुशांतला जबरदस्ती गांजा दिला गेला असेल. होय… हेच आहे. आपण करुन दाखवलं’ असं तापसीने लिहिलं आहे.

You might also like