सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्या प्रकरणात आदित्य चोप्राचा जबाब नोंदवला

 सुशांत सिंह राजपूत याच्या आत्महत्या प्रकरणात मुंबई पोलिसांनी यशराज फिल्म्‌स कंपनीचे प्रमुख आदित्य चोप्रा यांचा जबाब नोंदवला आहे. त्यांना त्यासाठी वर्सोवा पोलीस ठाण्यात बोलावून घेण्यात आले होते. तेथे चार तासांच्या जाबजबाबानंतर त्यांना घरी सोडण्यात आले.सुशांतसिंह आत्महत्या प्रकरणाचा तपास विविध अंगांनी केला जात असून या प्रकरणाशी संबंधित सर्वांनाच पोलीस चौकशीसाठी बोलावले जात आहे. 

इतके जबाब नोंदवूनही सुशांतसिंह याच्या आत्महत्येचे नेमके कारण मात्र अजून समजू शकलेले नाही. सुशांतसिंह याने आत्महत्येपूर्वी कोणतीही चिठ्ठी लिहून ठेवलेली नाही. या संबंधात यशराज फिल्मस कंपनीचे कासिंटग डायरेक्‍टर शानू शर्मा यांचाही जबाब नोंदवण्यात आला आहे. एकूण 34 जणांचे जबाब पोलिसांनी नोंदवले आहेत.

दरम्यान, सुशांत सिंह राजपूतच्या निधनानंतर त्याची गर्लफ्रेंड रिया चक्रवर्ती नेटक-यांच्या निशाण्यावर आहे. रिया सुशांतचं घर सोडून गेल्यानंतर अवघ्या तीन-चार दिवसांतच सुशांतने आत्महत्या केली. त्यामुळे अनेकजण सुशांतच्या आत्महत्येला रियाला जबाबदार धरत आहेत.मुंबई पोलिसांनीसुध्दा याप्रकरणी तिची कसून चौकशी केली होती.

दरम्यान, सुशांत सिंह राजपूत ने त्यांच्या राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केली. तो ३४ वर्षांचा होता. त्याच्या आत्महत्येचं कारण समोर आलं नसून यासंबंधी पोलीस तपास करत आहेत. १४ जुलै सकाळी बराचवेळ सुशांतने घरचा दरवाजा उघडला नाही म्हणून त्याच्या घरी काम करणाऱ्या नोकराने दरवाजा तोडला. यावेळी सुशांतचा देह पंख्याला लटकलेल्या अवस्थेत आढळला.

You might also like