सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येप्रकरणी ‘त्या’ हिरव्या कपड्याचा होणार तपास

सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येप्रकरणी आता गळफास घेण्यासाठी वापरलेल्या त्या’ हिरव्या कपड्याचा होणार तपास होणार आहे. सुशांतने खरंच त्या कपड्याचा वापर करून आत्महत्या केली का, त्या कपड्याची क्षमता सुशांतचं ८० किलो वजन पेलवणारी होती का, याचा तपास केला जाणार आहे. सुशांतने गळफास घेण्यासाठी हिरव्या रंगाच्या नाइट गाऊनचा वापर केला होता.

मुंबई पोलिसांनी सुशांतच्या आत्महत्येप्रकरणी आतापर्यंत २५ हून अधिक लोकांचे जबाब नोंदवले आहेत. सुशांतच्या अंतिम शवविच्छेदन अहवालात गळफासाने श्वास कोंडून त्याचा मृत्यू झाल्याचं स्पष्ट केलं आहे. तरी त्याच्या आत्महत्येप्रकरणी इतर सर्व बाबींचा कसून तपास मुंबई पोलीस करत आहेत.

दरम्यान, सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येप्रकरणी संजय लीला भन्साळी यांचीही चौकशी होणार आहे. भन्साळींनी सुशांतला चित्रपटाची ऑफर दिली होती. मात्र दुसऱ्या एका मोठ्या बॅनरसाठी काम करत असल्यामुळे भन्साळींसोबत त्याला काम करता आलं नाही.

शूटिंगदरम्यान ‘ही’ अभिनेत्री कोरोना पॉझिटिव्ह

You might also like