सुशांत सिंग राजपूतच्या शेवटच्या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित

सुशांत सिंह राजपूतच्या दिल बेचारा या शेवटच्या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित करण्य आला आहे. यामध्ये सुशांतसोबत संजना सांघीची मुख्य भूमिका आहे. मुख्य भूमिका असलेला हा तिचा पहिलाच चित्रपट आहे.किझी आणि मॅनी या दोघांची ही प्रेमकहाणी आहे. किझी कॅन्सरग्रस्त आहे आणि मॅनीचं तिच्यावर खूप प्रेम आहे. मात्र ही सामान्य प्रेमकहाणी नाही. यात बरेच ट्विस्ट आहेत.

दरम्यान, १४ जून रोजी सुशांतने मुंबईतल्या त्याच्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. त्याचा हा चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित होणार होता. मात्र लॉकडाउनमुळे निर्मात्यांनी ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित करण्याचा निर्णय घेतला आहे. जवळपास तीन मिनिटांच्या या ट्रेलरमध्ये सुशांतने पुन्हा एकदा प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत.

 

प्रसाद ओकच्या पत्नीचा डान्स करतानाच व्हिडिओ व्हायरल

You might also like