सुशांत सिंह राजपूत प्रकरणी आता वेगळे वळण! वाचा कोणाची होणार चौकशी

१४ जून रोजी प्रसिद्ध अभिनेता सुशांत सिंह राजपूत याने राहत्या घरी आत्महत्या केली होती. सुशांत च्या अचानक जाण्याने चाहत्यांसह अनेकांना धक्का बसला होता. तर यामागे बॉलिवूड मध्ये मिळालेली वाईट वागणुक कारण असू शकते, असे मत अनेकांनी व्यक्त केल्या नंतर मुंबई पोलिसांनी शक्य त्या सर्व बाजू तपासण्याचे काम सुरु केले होते. या प्रकरणी सीबीआयने चौकशी करावी अशी मागणी देखील जोर धरत होती.

तर अनेक प्रसिद्ध बॉलिवूड स्टार्स तसेच दिग्दर्शक यांच्या चौकशी नंतर आता आणखी एका मोठ्या व्यक्तीची चौकशी केली जाणार असून त्यांच्यावर गंभीर आरोप केले जात आहेत. प्रख्यात चित्रपट समीक्षक राजीव मसंद यांचीही सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरणात चौकशी करण्यात येत आहे. सुशांतच्या काही सिनेमांना मसंद यांनी कमी रेटिंग्ज दिल्याने ते पोलिसांच्या रडारवर आहेत.

श्रावण सुरु झाला म्हणून प्राजक्ता करणार या खास गोष्टी

राजीव मसंद यांनी आपल्या समीक्षणात्मक शोमध्ये सुशांतच्या चित्रपटांबाबत अनेक वेळेला विरोधात भाष्य केल्याची माहिती आहे. सुशांतच्या चित्रपटांना त्यांनी कमी स्टार दिले होते. याबाबत त्यांची वांद्रे पोलिसांकडून चौकशी केली जात आहे. राजीव मसंद यांनी सुशांतच्या चित्रपटांबाबत खरंच दुजाभाव केला का? ते त्यांचे स्वतःचे मत होती कि कोणी त्यांच्यावर दबाव आणत होते? यासह सुशांतच्या विरोधात अनेक लेख व ब्लाइंड आर्टिकल म्हणजेच निनावी लेख छापून आले होते, त्यामुळे आता पोलीस या सर्व बाबींप्रकरणी मसंद यांची चौकशी पोलीस करत आहेत.

दरम्यान, याआधी बॉलिवूड मधील नेपोटीजमचा या मागे हात असल्याचे अभिनेत्री कंगना राणौत हिने म्हणले होते. त्यांनतर बॉलिवूड मधील नेपोटीजम ला चाहत्यांनी देखील चांगलेच लक्ष्य केले होते. तर आतापर्यंत, प्रसिद्ध निर्माते-दिग्दर्शक आदित्य चोप्रा, संजय लीला भन्साळी यांचीही सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरणात चौकशी झाली आहे. सुशांतचे कुटुंबीय, कर्मचारी, गर्लफ्रेंड रिया चक्रवर्ती, ‘दिल बेचारा’ या सुशांतच्या अखेरच्या सिनेमाची सहनायिका संजना संघी अशा अनेक जणांची चौकशी सुरु आहे.

‘या’ सुंदर मुलीच्या प्रेमात पागल झालाय सचिनचा मुलगा ?

You might also like