सुशांत प्रकरणी रामदेव बाबा यांचा खळबळजनक आरोप

सुशांत सिंह मृत्यू प्रकरणाच्या चौकशीत ‘बॉलिवूड ड्रग्ज प्रकरण’ समोर आलं आहे. लक्षवेधी बाब म्हणजे या चौकशीदरम्यान सारा अली खान, रकुल प्रित सिंह, सिमोन खंबाटा, श्रद्धा कपूर, नम्रता शिरोडकर, दीपिका पदुकोण, दिया मिर्झा, अबिगल पांडे यांसारख्या अनेक नामांकित कलाकारांची नावं समोर आली आहेत.

आता या प्रकरणावर रामदेव बाबा यांनी आपली प्रतिक्रिया दिली. सुशांतला जबरदस्तीने ड्रग्ज देऊन त्याची हत्या करण्यात आली, असा खळबळजनक आरोप त्यांनी केला आहे. एका मुलाखतीत बाबा रामदेव यांनी सुशांत प्रकरणावर भाष्य केलं.

ते म्हणाले, “सुशांत एक महत्वाकांक्षी कलाकार होता. त्याला आयुष्यात खूप काही मिळवायचं होतं. नियोजनबद्ध आयुष्य जगणारा व्यक्ती कधीच आत्महत्या करणार नाही. तो ज्या बॉलिवूडमध्ये काम करत होता ते क्षेत्र ड्रग्जसारख्या वाईट सवयींनी बरबटलेलं आहे. सुशांतला जबरदस्तीने ड्रग्ज देऊन त्याची हत्या करण्यात आली. एनसीबी लवकरच खऱ्या गुन्हेगारांना शोधून काढेल याची आम्हाला खात्री आहे.”

 

You might also like