‘सोनचिडिया’ चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित

‘सोनचिडिया’ चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित करण्यात आला आहे. या चित्रपटाची गोष्ट आहे ती १९७५ साली लागू केलेल्या आणीबाणीवर. त्यानंतर चंबळमधल्या दरोडेखोरांचं आयुष्य पूर्णपणे बदलतं याच गोष्टीवर आधारलेला आहे ‘सोनचिडिया’ हा चित्रपट.

आणीबाणीनंतर चंबळमध्ये राज्य करणाऱ्या दरोडेखोरांच्या आयुष्यात वादळ येतं आणि पुढे एकापाठोपाठ एक गुन्हे घडत जातात. साधरण अशा स्वरुपाची कथा ‘सोनचिडिया’मध्ये पाहायला मिळणार आहे. या चित्रपटात सुशांत सिंह राजपूत, भूमी पेडणेकर, मनोज बाजपेयी आणि रणवीर शौरी यांची प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत. भूमी आणि सुशांत दोघंही चंबळमधल्या दरोडेखोरांच्या भूमिकेत आहे.

चित्रपटातील काही  दृश्य चंबळमध्ये चित्रीत करण्यात आलं आहे. अभिषेक चौबे या चित्रपटाचं दिग्दर्शन आहे. ८ फेब्रुवारी २०१९ मध्ये हा चित्रपट प्रदर्शित होत आहे.

महत्वाच्या बातम्या –

You might also like