‘होय सुशांत ड्रग्ज घेत होता’, या दोन अभिनेत्रींकडून चौकशीदरम्यान कबुली

सुशांत सिंह राजपूत हा ड्रग्ज घेत होता अशी कबुली सारा अली खानने दिली होती. NCB कडून तिची चौकशी होती. त्यानंतर लगेच श्रद्धा कपूरने सुद्धा याबाबत खुलासा केला. तिनेसुद्धा सुशांत ड्रग्ज घेत असल्याचं चौकशीत सांगितलं.
सुशांतसिंह राजपूतशी केदारनाथच्या शुटींग दरम्यान जवळीक निर्माण झाली होती. सुशांत लोणावळ्याला फार्म हाऊसवर वीड ओढायचा अशी कबुली साराने दिली. चित्रपटाच्या शूटिंगनंतर ती सुशांतच्या घरी ‘कॅपरी हाऊस’ मध्ये बर्याच वेळा सुशांतलाही भेटायची. साराने सुशांतसोबत अनेकदा लोणावळ्याच्या फार्म हाऊसवर गेलो, असंही तिने चौकशीत सांगितले.
सारा अली खान हिने ड्रग्ज घेतल्याचा आरोप फेटाळून लावला. कोणत्याही ड्रग्ज पेडरलला ओळखत नाही, असे चौकशी दरम्यान साराने एनसीबी अधिकाऱ्यांना सांगितले
स्वतः ड्रग्जचं सेवन करत असल्याचा आरोप श्रद्धा कपूरनेसुद्धा फेटाळला आहे. पवना धरणात झालेल्या पार्टीची कबुलीही दिली. काही व्हाॅट्सअपचॅटला देखील तिने नकार दिला आहे.