सुशांतच्या आठवणीत अंकिता लोखंडे भावुक

सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणात बिहार पोलिसांनी जो गुन्हा दाखल केला आहे. तो मुंबईत वर्ग करावा, अशी मागणी करणारा अर्ज अभिनेत्री रिया चक्रवर्ती हिने सर्वोच्च न्यायालयात दाखल केला होता. पण बिहार सरकारने रियाच्या मागणीला विरोध केला असून तिची मागणी अमान्य करावी, असा युक्तिवाद कोर्टात केला आहे.
यातच आता अंकिता लोखंडेने इन्स्टाग्रामवर सुशांतच्या आईचा एक फोटो शेअर केला आहे. “तुम्ही दोघं एकमेकांच्या सोबत असाल अशी आशा करते”, असं कॅप्शन अंकिताने या फोटोला दिला आहे. सुशांतचं त्याच्या आईवर जीवापाड प्रेम होतं. मृत्यूनंतर सुशांत त्याच्या आईसोबत असेल अशी आशा अंकिताने व्यक्त केली आहे.
तत्पूर्वी अंकिताने सोशल मीडियावर एक पोस्ट लिहिली होती. ,’सत्याचा विजय’ सध्या अंकिताने शेअर केलेल्या या पोस्टचा संदर्भ सोशल मीडिया युजर्स रिया चक्रवर्तीच्या विरोधात तक्रार दाखल केलेल्या घटनेशी जोडले जात आहे. सोशल मीडियावर अंकिताने केलेल्या पोस्टला युजर्स कडून चांगलाच प्रतिसाद मंजीलत आहे .