सुशांत आत्महत्या करुच शकत नाही त्याची हत्याच झाली आहे !

सुशांत आत्महत्या कधीच करुच शकतं नाही, त्याची हत्या झाली आहे, असा खळबळजनक आरोप सुशांतसिंह राजपूतला अभिनय शिकवणारे कोच नरेश दिवाकर यांनी केला आहे.

सुशांतसोबत मी बराचकाळ राहिलो आहे. त्याच्यासोबत मी काम केलं आहे. मी त्याचा अ‍ॅक्टिंग कोच देखील होतो. सुशांत आत्महत्या करुच शकत नाही, त्याची हत्या झाली आहे, असं नरेश दिवाकर यांनी म्हटलंय.

सुशांत एक हुशार मुलगा होता, जो विज्ञान्याबाबत बोलायचा. शूटिंग दरम्यान एकदा त्याला राग आला होता तेव्हा त्याने फोन भिंतीला फेकून मारला होता. मात्र तो डिप्रेशनमध्ये कधीच नव्हता, असंही नरेश दिवाकर याने सांगितलंय.

दरम्यान, सुशांतसिंह राजपूत प्रकरणात रोज नव-नविन खुलासे होत आहेत. या केसचा तपास सीबीआय करत आहे. पुढे या केसचा निकाल काय लागणार याकडे सगळयांचं लक्ष लागलं आहे.

 

You might also like