‘सूर्यवंशी’ही ओटीटी प्लॅटफॉर्मवर?

लॉकडाऊनमुळे अद्यापही थिएटर्स बंद असून नुकतेच चित्रीकरणास परवानगी देण्यात आली आहे. मात्र, चित्रपटगृहे कधी खुले होतील, हे अद्यापही अनिश्‍चित आहे. यामुळे अनेक महिन्यांपासून प्रदर्शनाच्या प्रतीक्षेत असलेले चित्रपट आता ओटीटी प्लॅटफॉर्मकडे वळत असल्याने थिएटर लॉबी नाराज होत आहे.

यामुळे “सूर्यवंशी’ आणि “83′ हे चित्रपट थिएटरवरच चित्रपट रिलीज करू अशी हमी दिल्यावर थिएटरवाले निश्‍चिंत झाले. पण आता मात्र हे चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर येणार असल्याचे समजते. दिवाळी किंवा जास्तीत जास्त नाताळपर्यंत चित्रपटगृहे न उघडल्यास हे दोन्ही चित्रपट ओटीटीवर येण्याची शक्‍यता आहे. या दोन्ही सिनेमांबद्दल कमालीची उत्सुकता आहे.

त्यामुळे ओटीटी वाल्यांनीही मोठी ऑफर या सिनेमांसमोर ठेवली आहे. रिलायन्स एंटरटेन्मेंटच्या गोटातून याची चाचपणी सुरू झाली आहे. पण येत्या काही दिवसांत थिएटर्स उघडणार की नाही ते कळल्यानंतर पुढची पावले उचलली जाणार आहेत.

दरम्यान, “सूर्यवंशी’मध्ये अक्षय कुमार मुख्य भूमिका साकारत आहे. त्यामुळे अक्षयच्या चाहत्यांचे या सिनेमावर लक्ष आहे. दुसरीकडे 83 हा चित्रपट भारताने जिंकलेल्या वर्ल्डकपवर आधारित असल्याने त्याबद्दलही प्रचंड उत्सुकता आहे. यात रणवीर सिंगची मुख्य भूमिका असून, दीपिका पदुकोण, आदिनाथ कोठारे, चिराग पाटील यांच्याही भूमिका आहेत.

You might also like