सुरवीन चावलाने लेकीचा पहिला फोटो केला शेअर

टेलिव्हिजन आणि चित्रपट विश्वात आपली ओळख प्रस्थापित केल्यानंतर सुरवीन चावलाने तिच्या कुटुंबालाही तितकच प्राधान्य दिलं. काही दिवसांपूर्वीच तिने एका गोंडस मुलीला जन्मही दिला. आपल्या याच लाडक्या लेकीचा फोटो तिने सोशल मीडियावर शेअर केला आहे.
“To love …I know now…. ”, असं एकाच ओळीत खुप काही सांगणारं भावनिक कॅप्शन तिने या फोटोवर लिहिलं. सुरवीनचा हा फोटो पाहता अनेकांनीच त्यावर सुरेख अशा प्रतिक्रिया दिल्या आहेत.
लग्न झाल्यापासून ते गरोदरपणाच्या बातमीपर्यंत बरीच माहिती सुरवीनने सोशल मीडियाच्याच माध्यमातून दिली. इटलीत तिने व्यावसायिक अक्षय ठक्कर याच्याशी लग्नगाठ बांधली होती.