सुरेखा पुणेकर म्हणतात, ‘बिग बॉस झालं आता लढाई विधानसभेसाठी’

बिग बॉस मराठी सिझन 2 मधून सुरेखा पुणेकर बाहेर पडल्यानंतर एका न्यूज चॅनेलने खास बातचीत केली आहे. यावेळी त्यांनी बिग बॉसच्या घरातील अनुभव सांगितले. बिग बॉसच्या घरातून सुरेखा पुणेकरांना कोणत्या गोष्टी शिकायला मिळाल्या? कोणत्या गोष्टी खटकल्या, अंतिम टप्प्यातील दावेदार कोण असेल अशा अनेक गोष्टी त्यांनी सांगितल्या आहे. मात्र बिग बॉस झालं आता लढाई विधानसभेसाठी असेल असं त्यांनी म्हटलं आहे.
सुरेखाताई म्हणाल्या, ‘माझा पुढचा बाणविधानसभेत लागलाच पाहिजे अशी माझी अपेक्षा आहे. मी आज महाराष्ट्रसाठी एवढं केलं. मी कलावंत घडवले. मी कलावंतांना जगवलं. मी तंबूतली लावणी सभागृहात आणिली अमेरिकेला नेली. मग ती लावणी विधानसभेत का जाऊ नये? आणि ती विधानसभेत गेली तर माझ्या आत्म्याला शांती मिळेल.’
महाराष्ट्राच्या लावणी सम्राज्ञी सुरेखा पुणेकर या आठवड्यात बिग बॉसच्या घरातून बाहेर पडल्या.वीक एंडचा डावमध्ये महेश मांजरेकर यांनी सुरेखा पुणेकर एलिमिनेट झाल्याचे जाहीर केले.’मी सहा आठवडे या घरात राहिले याचा मला अभिमान आहे. घरातील सगळ्यांनी मला जो मान दिला त्यासाठी मी आनंदी आहे’ असं त्या म्हणाल्या.