‘सूर सपाटा’ चित्रपटाचा टिझर प्रदर्शित

जयंत लाडे निर्माता हयांचा लाडे ब्रोज् फिल्म्सप्रा. लि या निर्मितीसंस्थेचा ‘सूर सपाटा’ हा गावठी कबड्डीवर आधारित मराठी चित्रपट २२ मार्चला संपूर्ण महाराष्ट्रालाकबड्डी… कबड्डी… म्हणायला भाग पाडेल यात काही शंका नाही.नुकतेच या चित्रपटाचे टिझर प्रदर्शित करण्यात आले आहे.

जिल्हापरिषदेच्या शाळेतील काही सामान्य विद्यार्थ्यांतील असामान्य कौशल्य जाणून त्यांना स्पर्धेमध्ये उतरवू पाहणारे शिक्षक एकीकडे तर आपणही एखादं मैदान मारू शकतो याची जाणीव झालेले विद्यार्थी दुसरीकडे. या दोघांमधला सुवर्णमध्य साधणारा ‘सूर सपाटा’ प्रत्येकाला आयुष्यात काहीतरी करून दाखवण्याची एक संधी मिळाली तर तो त्याचं कसं सोनं करू शकतो हे दाखवतो. लाडे ब्रोज् फिल्म्सचा ‘सूर सपाटा’ हा दुसरा चित्रपट असून या आधी त्यांनी ‘पेईंग घोस्ट’ या विनोदी चित्रपटाची यशस्वी निर्मिती केली होती.

महत्वाच्या बातम्या –

 

You might also like