सुनील ग्रोव्हरचा ‘कानपूरवाले खुराणाज्’ होणार बंद !

सुनील ग्रोव्हरचा ‘कानपूरवाले खुराणाज्’ हा कॉमेडी शो चर्चेत आहे. प्रेक्षकांनी तो डोक्यावर घेतला होता. पण या शोच्या चाहत्यांनसाठी एक दुःखद बातमी आहे. लवकरच हा शो बंद होणार आहे. डिसेंबरमध्ये सुनील ग्रोव्हरचा हा शो सुरु झाला होता.
आता याचे कारण काय? असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. तर सलमान खानचा आगामी चित्रपट ‘भारत’ मुळे ‘कानपूरवाले खुराणाज्’ बंद होणार आहे.खुद्द सुनील ग्रोव्हरनेच ‘पिंकविला’ला दिलेल्या मुलाखतीत याचा खुलासा केला आहे.
माझा शो माझ्यामुळेच बंद होतोय, असे सुनीलने यावेळी सांगितले. मी हा शो केवळ ८ आठवड्यांसाठीच साईन केला होता. कारण मी आधीच ‘भारत’ या चित्रपटासाठी माझ्या डेट्स दिल्या होत्या. माझ्या हाती जितका वेळ होता, तितकाच मी देऊ शकलो. ‘भारत’च्या शूटींगदरम्यान माझ्याकडे महिनाभराचा वेळ होता. त्यामुळे मी महिनाभराचा शो सत्कारणी लावला. असे सुनीलने सांगितले. १० जानेवारी पासून सुनील ‘भारत’च्या शूटींगमध्ये बिझी झाला. पुढील दीड महिना ‘भारत’चे शूटींग चालणार आहे.
‘भारत’बद्दल सांगायचे तर यात भाईजान सलमान खान मुख्य भूमिकेत आहे. त्याच्याशिवाय कॅटरिना कैफ, दिशा पटानी, तब्बू, जॅकी श्रॉफ असे अनेक कलाकार यात आहेत. सुनील ग्रोव्हर यात एका महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसणार आहे.
महत्वाच्या बातम्या –
- रणबीर-आलिया करणार साखरपुडा?
- सोनाक्षी सिन्हाने केला मोठा खुलासा…..!
- ‘मणिकर्णिका- द क्वीन ऑफ झाँसी’चे ‘विजयी भवं’ हे गाणं प्रदर्शित
- मराठी चित्रपटसृष्टीला मिळाला नवीन व्हिलन