जुने वाद विसरून सुनील परतणार ‘द कपिल शर्मा शो’मध्ये?

कपिलसोबतच्या वादानंतर सुनीलने ‘द कपिल शर्मा शो’ सोडला आणि त्यानंतर कपिलचा वाईट काळ सुरू झाला. कपिलने बऱ्याचदा वाद विसरून सुनीलशी बोलण्याचा प्रयत्न केला, पण त्याच्या अपेक्षेप्रमाणे यश मिळालं नाही.अखेर वर्षभराच्या वादावादीनंतर सुनील आणि कपिल पुन्हा एकदा एकत्र येणार असल्याचं कळतंय.

सुनीलचा ‘कानपूरवाले खुरानास’ हा शो बंद होण्याच्या मार्गावर आहे. फक्त आठ आठवड्यांसाठीच त्याने हा शो साइन केला होता. ‘माझ्या हातात जितका वेळ होता, तितकाच वेळ मी या शो ला देऊ शकलो. ‘भारत’ चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान माझ्याकडे महिनाभराचा वेळ होता. त्यामुळे हा वेळ मी सत्कारणी लावला,’ असं त्याने म्हटलं होतं. ‘आयबीटी’ने दिलेल्या वृत्तानुसार ‘भारत’चे शूटिंग पूर्ण होताच सुनील ‘द कपिल शर्मा शो’मध्ये परतणार असल्याचं कळतंय.

महत्वाच्या बातम्या –

You might also like