टीव्ही अभिनेता राहुल दीक्षितची गळफास घेऊन आत्महत्या

छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध अभिनेता राहुल दीक्षित याने आज बांद्र्यातील लोखंडवाला कॉम्प्लेक्स मधील आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक बातमी उघडकीस आली आहे. राहुलने आपल्या बेडरूमच्या छताला स्वतःला बेडशीटद्वारे टांगून घेतल्याचे लक्षात येताच त्याच्या कुटुंबीयांनी त्याला नजीकच्या रुग्णालयामध्ये दाखल केले. मात्र उपचारांपूर्वीच २८ वर्षीय राहुल याचा मृत्यू झाला असल्याचे डॉक्टरांनी घोषित केले.

पोलिसांनी याप्रकरणी अपघाती मृत्यू म्हणून नोंद केली आहे. बुधवारी सकाळी हा सर्व  प्रकार उघडकीस आला. त्याने कोणत्या कारणासाठी आत्महत्या केली हे अद्याप कळू शकलेले नाही. पोलीस याचा शोध घेत आहेत. मात्र, तो एक स्ट्रगलर अभिनेता असल्याने नैराश्यातून त्याने हे टोकाचे पाऊल उचलले असावे असे सांगण्यात येत आहे.

महत्वाच्या बातम्या –