‘दबंग 3’मध्ये कन्नडचा ‘हा’ सुपरस्टार बनणार खलनायक….!

सलमान खान ‘भारत’ चित्रपटानंतर ‘दबंग 3’चे शूटींग सुरु करणार आहे. येत्या एप्रिलपासून हे शूटींग सुरु होईल. या चित्रपटात सलमानच्या अपोझिट पुन्हा एकदा सोनाक्षी सिन्हा झळकणार आहे, हे सगळ्यांनाच ठाऊक आहे. पण चाहत्यांना खरी प्रतीक्षा आहे ती, या चित्रपटात विलेन कोण असणार हे जाणून घेण्याची. आता तेही स्पष्ट झाले आहे. ताजी बातमी खरी मानाल तर कन्नड स्टार किच्चा सुदीप हा ‘दबंग 3’चा विलेन असणार आहे.

मुंबई मिररने याबाबतचे वृत्त दिले आहे. सुदीप व सलमान दीर्घ काळापासून एकत्र काम करू इच्छितात. अखेर ‘दबंग 3’च्या निमित्ताने हा योग जुळून आला, असेचं म्हणायला हवे. सुदीप कन्नडच्या अनेक चित्रपटात दिसला आहे.

महत्वाच्या बातम्या –

You might also like