सुशांतने मृत्यूच्या दिवशी दुबईतल्या ड्रग डिलरची का घेतली होती भेट?

‘ज्या दिवशी सुशांतचा मृत्यू झाला त्या दिवशी तो दुबईतील ड्रग डिलरला भेटला होता’, असं वक्तव्य भाजपाचे खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी केलं आहे. त्यांच्या या वक्तव्यानंतर अनेकांच्या नजरा त्यांच्याकडे वळल्या आहेत. या पूर्वीदेखील त्यांनी सुशांतच्या मृत्यूचा आणि दुबई कनेक्शन असल्याचं म्हटलं होतं.

सुशांत सिंह राजपूतचाने आत्महत्या केली नसून ती हत्याच आहे, असा दावा सुब्रमण्यम स्वामी यांनी यापूर्वी केला आहे. तसंच सुशांत प्रकरणाचा तपास सीबीआयने करावा याविषयीदेखील ते आग्रही होते. त्यातच आता त्यांनी केलेलं नवीन वक्तव्य अनेकांचं लक्ष वेधत आहे.

“सुनंदा पुष्कर प्रकरणात सगळ्या महत्त्वाची गोष्ट कोणती होती?, त्यांचं शवविच्छेदन करत असताना एम्सच्या डॉक्टरांना त्यांच्या पोटात कोणती गोष्ट आढळून आली होती? परंतु, श्रीदेवी आणि सुशांत यांच्या प्रकरणात असं काहीच झालं नाही. मात्र सुशांत प्रकरणात दुबईतील ड्रग्स डिलर अयाश खान सुशांतच्या मृत्यूच्याच दिवशी त्याला भेटला होता. का?”, असे प्रश्न सुब्रमण्यम स्वामी यांनी उपस्थित केले आहेत.

You might also like