सुबोध भावे ‘ह्या’ चित्रपटात एका वेगळ्या भूमिकेत दिसणार

ज्योती प्रकाश फिल्म्स निर्मिती संस्थेअंतर्गत हरिश्चंद्र गुप्ता निर्मित आणि डॉ. राज माने लिखित आणि दिग्दर्शित ‘काही क्षण प्रेमाचे’ हा चित्रपट लवकरच आपल्या भेटीला येत आहे. सुबोध भावे ह्या सिनेमात एका वेगळ्या भूमिकेत दिसणार आहे. सुबोधसोबत भार्गवी चिरमुले मुख्य भूमिकेत दिसणार आहे. नुकतचं ह्या चित्रपटाचे पोस्टर प्रदर्शित झाले.
सुबोधचा ‘काही क्षण प्रेमाचे’ हा तब्बल ६२ वा चित्रपट आहे. मात्र सुबोध काही क्षण प्रेमाचे ह्या सिनेमातून एक परिपक्व प्रेमकथा घेऊन येत आहे. नात्यांमधली परिपक्वता आणि आपल्या जोडीदारासाठी केललं बलिदान ह्या चित्रपटातून मांडण्यात आली आहे.
या चित्रपटाची कथा एका सामान्य माणसाची आहे जो आपल्या कुटूंबाच्या गरजा पूर्ण करण्यासाठी अहोरात्र परिश्रम करतो. अशा वेळी आपल्या कुटुंबियांसोबत ”प्रेमाचे” दोन शब्द बोलण्याकरताही त्याच्याकडे वेळ नसतो. त्याचवेळी अचानक त्याच्या आयुष्यात एक मोठं वादळं येते ज्याने त्याचे संपुर्ण आयुष्य बदलून जाते. त्यातून तो आणि त्याचे कुटूंब कसा मार्ग काढणार तो प्रवास ह्या चित्रपटातून दाखवण्यात येणार आहे.
महत्वाच्या बातम्या –