सुबोध भावेला साकारायचीय ‘या’ व्यक्तीची भूमिका

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष व ज्येष्ठ नेते शरद पवार यांची भूमिका साकारायला नक्कीच आवडेल, असं मत अभिनेता सुबोध भावेनं व्यक्त केलं.

‘मनात काय चाललंय हे तुम्हाला काहीच कळू द्यायचं नाही. हे फार अवघड आहे. शरद पवार ५५ वर्ष राजकारणात आहेत. त्यांनी जेवढं बघितलंय तेवढं आज राजकारणात कोणीच पाहिलेलं नाही. मी चेष्टा म्हणून म्हणत नाही, पण सतत सातत्यानं व्यक्त होणाऱ्या नेत्यांपेक्षा एक नेता जो योग्य ठिकाणी योग्य वेळ येताच व्यक्त होतो, अशा नेत्याची भूमिका करायला मला नक्कीच आवडेल,’ असं सुबोध म्हणाला.

 

You might also like