‘तुला पाहते रे’ या मालिकेच्या निरोपानंतर सुबोध भावे म्हणतो…

‘तुला पाहते रे’ या मालिकेने अखेर शनिवारी प्रेक्षकांचा निरोप घेतला. त्यामुळेच सुबोध भावेने ट्विटरच्या माध्यमातून प्रेक्षकांसाठी एक खास संदेश दिला.
“आणि आज मालिका संपली.तुमच्या सर्वांचं भरभरून प्रेम आयुष्यभर आम्हाला ऊर्जा देत राहील. झी मराठी वाहिनी,आमचे निर्माते, दिग्दर्शक,तंत्रज्ञ आणि कलाकार या सर्वांमुळे ही मालिका झाली. तुमचे “तुला पाहते रे” संघाच्या वतीने मनपूर्वक धन्यवाद. ” विक्रांत ” कडून खूप प्रेम. भेटूया लवकरच. रामराम”, असं ट्विट करत सुबोधने साऱ्यांचे आभार मानले.
आणि आज मालिका संपली.
तुमच्या सर्वांचं भरभरून प्रेम आयुष्यभर आम्हाला ऊर्जा देत राहील.
झी मराठी वाहिनी,आमचे निर्माते, दिग्दर्शक,तंत्रज्ञ आणि कलाकार या सर्वांमुळे ही मालिका झाली
तुमचे "तुला पाहते रे" संघाच्या वतीने मनपूर्वक धन्यवाद.
" विक्रांत " कडून खूप प्रेम.
भेटूया लवकरच.
रामराम pic.twitter.com/zKPt3GhlqC— सुबोध भावे (@subodhbhave) July 20, 2019