सुबोध भावे म्हणतोय सर्व केसेस कमी केल्या…..

लॉकडाऊनमध्ये सुबोध भावेकडे बराच वेळ शिल्लक आहे. हा वेळ तो घरच्यांना देतो आहेच. पण सोशल मिडियावर चाहत्यांशीही संपर्कात आहे. तो सोशल मिडियावर अनेकदा धमाल पोस्ट शेअर करताना दिसत आहे.

नुकतेच त्याने एक धम्माल पोस्ट शेअर केली आहे. पोस्टमधून त्याने त्याचा नवीन लूक शेअर केला आहे. या लॉकडाऊनमध्ये सलून बंद असल्याने सुबोधचे दाढी आणि केस बरेच वाढले होते. पण आता त्याने हेअर कट आणि शेव केल्याचे पोस्ट मधून पहायला मिळत आहे. या फोटोला मजेदार कॅप्शन देताना तो म्हणतो, ‘सर्व केसेस कमी केल्या’ . अर्थात त्याच्या भन्नाट कॅप्शनला चाहत्यांनी रिप्लायही भन्नाट दिलं आहेच.

 

You might also like