पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बायोपिकची शूटिंग सुरू

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची यशोगाथा सांगणारा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. चित्रपटात पंतप्रधान मोदींची भूमिका अभिनेता विवेक ऑबेरॉय साकारणार आहे. आता या चित्रपटाच्या शूटिंगला प्रारंभ झाला. अहमदाबादमध्ये शूटिंगचे नारळ फोडण्यात आले.
ट्रेड अॅनलिस्ट तरण आदर्श यांनी ट्विटरवर चित्रपटाच्या पहिल्या दिवसाचे फोटो शेअर केले.फोटो मध्ये विवेक ओबेरॉय आणि ओमंग कुमार सिनेमाच्या शूटिंगसाठी सज्ज असल्याचे दिसत आहे.
चित्रपटाच्या मुख्य भूमिकेत विवेक ऑबेरॉय झळकणार असून बोमन ईरानी आणि दर्शन कुमार दिसणार आहेत. चित्रपटाची निर्मिती सुरेश ऑबेरॉय आणि संदीप एस सिंह करणार असून चित्रपटाचे दिग्दर्शन ओमंग कुमार करणार आहे.
Narendra Modi biopic filming begins in #Ahmedabad today… Will be shot at various locations in #Gujarat… #PMNarendraModi stars Vivek Anand Oberoi… Costars Boman Irani and Darshan Kumaar… Directed by Omung Kumar B… Produced by Suresh Oberoi and Sandip Ssingh. pic.twitter.com/FJP3EQ1kMO
— taran adarsh (@taran_adarsh) January 28, 2019
महत्वाच्या बातम्या –