आषाढी एकादशीनिमित्त रितेश देशमुखच्या खास शुभेच्छा

रितेश देशमुख आणि श्रीहरी विठ्ठल यांचंही खास नातं आहे. बॉलिवूडमध्ये नंतर मराठीत लय भारी सिनेमाद्वारे रितेशने दमदार पदार्पण केलं. ह्या सिनेमाची कथासुध्दा पांडुरंगाच्या पंडरपुरनगरीत घडली व त्यात विठ्ठलाचा असीम भक्त माऊली या तरुण रितेशने साकारत चाहत्यांची भक्तांची मनं जिंकली. त्यानंतर गेल्यावर्षी माऊली या दुस-या मराठीसिनेमातूनसुध्दा रितेशची विठ्ठल भक्ती पाहायला मिळाली.
आज आषाढी एकादशीनिमत्त रितेश देशमुखने इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. रितेशने हा व्हिडिओ पोस्ट करत आषाढी एकादशीनिमत्त सर्वांना शुभेच्छा दिल्या आहेत. मोजक्याच वारक-यांच्या उपस्थित मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी सपत्निक विठ्ठलाची पूजा केली. यंदा प्रत्यक्ष श्री विठ्ठलाचं दर्शन याचि देहि, याची डोळा घेता येत नसलं तरी विठ्ठल प्रत्येकाच्या मनामध्ये आहे.