‘मराठी तारका’च्या ११ व्या वर्षपूर्तीनिमित्त रंगणार विशेष सोहळा

‘मराठी तारका’ या कार्यक्रमानं ११ वर्षं पूर्ण केली आहेत. या खास औचित्याने निर्माता, दिग्दर्शक महेश टिळेकर यांची संकल्पना आणि निर्मिती असलेल्या या कार्यक्रमाचा विशेष सोहळा १३ जानेवारीला सायंकाळी ६ वाजता मुंबईतील वर्सोवा मेट्रो स्टेशनजवळच्या मैदानात रंगणार आहे. या सोहळ्याला बॉलिवूडमधील अनेक दिग्गज उपस्थित राहणार आहेत.

११ वर्षांपासून मराठी अभिनेत्रींचा सहभाग असलेल्या ‘मराठी तारका’ या गीत-संगीत-नृत्याच्या कार्यक्रमाने मराठी प्रेक्षकांचं मनोरंजन केलं आहे. मराठी अभिनेत्रींना ग्लॅमर मिळवून देणारा हा कार्यक्रम दुबई, अमेरिका, लंडन आणि भारतभरात मिळून ५०० हून अधिक शोज झाले आहेत. आत्तापर्यत सहा पिढ्यांमधील अभिनेत्रींनी मराठी तारका या कार्यक्रमात नृत्यकला सादर केली आहे आणि करीत आहेत.

महत्वाच्या बातम्या –