‘या’ दाक्षिणात्य अभिनेत्याला कोरोनाची लागण

महाराष्ट्रात कोरोना व्हायरस विषाणूचा प्रार्दुभाव रोखण्यासाठी राज्य सरकार सह सर्व प्रशासकीय यंत्रणा सर्वोतोपरी प्रयत्न करत आहे. राज्यात कोरोना बाधितांची संख्या दिवसागणिक वाढत असून काल 233 मृत्यू आणि 7,975 नवीन कोरोना व्हायरस रुग्णांची नोंद झाली.

यासह राज्यात एकूण संक्रमित रुग्णांची संख्या 2,75,640 वर पोहोचली आहे. आज राज्यात 3,606 रुग्ण बरे झाले असून, आतापर्यंत तब्बल 1,52,613 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. सध्या महाराष्ट्राचा रुग्ण बरे होण्याचा दर  55.37 टक्के आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर 3.96 टक्के इतका आहे. सध्या राज्यात एकूण 1,11,801 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत.

सामान्यांपासून ते सेलिब्रिटींपर्यंत आतापर्यंत अनेकांना करोनाची लागण झाली आहे. यात दाक्षिणात्य सुपरस्टार ध्रुव सर्जा आणि त्याची पत्नी प्रेरणा शंकर यांनादेखील करोनाची लागण झाली आहे. अभिनेत्याने स्वत: ट्विट करत ही माहिती दिली. कोरोना टेस्टचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर ध्रुव सर्जा आणि त्याच्या पत्नीवर बंगळुरु येथील रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

“माझ्या पत्नीला आणि मला करोनाची लागण झाली आहे. आमचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या आम्ही दोघंही रुग्णालयात अॅडमिट आहोत. मला खात्री आहे आम्ही दोघंही बरे होऊन लवकरच परत येऊ. जे कोणी आमच्या संपर्कात आले होते, त्या सगळ्यांनी कृपया करोना चाचणी करुन घ्या आणि काळजी घ्या”, असं ट्विट ध्रुव सर्जाने केलं आहे.

 

You might also like