लवकरच प्रिया बापट आणि उमेश कामत ऑनस्क्रीन झळकणार

प्रिया बापट आणि उमेश कामत या दोघांच्या चाहत्यांसाठी एक खुश खबर आहे. ती खुश खबर म्हणजे तिने एक ग्रुप फोटो शेअर करत उमेश कामतसह ती लवकरच ऑनस्क्रीन झळकणार असल्याचे संकेत दिले आहेत.

सिनेमाची कथा, दोघांची भूमिका याबाबत अद्याप काहीही स्पष्ट करण्यात आलेले नसले तरीही उमेश आणि प्रियाच्या या आगामी सिनेमाची रसिकांना नक्कीच उत्सुकता असेल.

२०१३ साली उमेश आणि प्रिया ‘टाईप प्लिज’ या चित्रपटात एकत्र झळकली होती. त्यामुळे हे दोघेही कधी ऑनस्क्रीन पाहायला मिळणार याचीच चाहते आतुरतेने वाट पाहात होते. आणि अखेर चाहत्यांची इच्छा लवकरच पूर्ण होणार असल्याचे दिसून येत आहे.

महत्वाच्या बातम्या –

 

You might also like