सोनू सुदने पोलिसांसाठी केली ‘ही’ मौल्यवान मदत!

अभिनेता सोनू सूदने पुन्हा मनाचा मोठेपणा दाखवत महाराष्ट्र पोलिसांसाठी भरघोस मदत केली आहे.  सोनू सूदने काल गृहमंत्री अनिल देशमुख यांची भेट घेऊन पोलीस कर्मचाऱ्यांसाठी २५ हजार फेस शिल्ड भेट दिल्या आहेत.

गृहमंत्री देशमुख यांनी स्वत: ट्विट करत ही माहिती दिली आहे. तसेच सोनू सूदने दिलेल्या अतुलनीय योगदानाबद्दल त्याचे आभारही मानले आहेत.

मुंबईसह राज्यातील करोनचा प्रादुर्भाव वाढत असला तरी पोलिसांना त्यांचं कर्तव्य बजवावंच लागतं. अशावेळी करोना संसर्गापासून बचाव होण्यासाठी पोलिसांना या फेस शिल्डचा मोठा उपयोग होणार आहे.दरम्यान, सोनू सूदने लॉकडाऊनच्या पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यात स्थलांतरित मजुरांसाठी मोठं काम केलं होतं. महाराष्ट्र सरकारमधील मंत्र्यांनी तसंच मुख्यमंत्र्यांनी त्याचं कामाचं कौतुक केलं होतं.

You might also like