आयफोन मागणाऱ्या यूजरला सोनू सूदचे भन्नाट उत्तर

सोनू सूद सोशल मीडियावर सतत चर्चेत असतो. तो कधी गरीबांना मदत करतो तर कधी यूजर्सला भन्नाट रिप्लाय देताना दिसतो. सोनू सूदने लॉकडाउनच्या काळात अनेक प्रवासी मजदूर कामगारांना त्यांच्या घरी पोहोचवण्यास मदत केली.  त्यामुळे तो सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असल्याचे पाहायला मिळते. नुकताच सोनू सूदने आयफोन मागणाऱ्या एका यूजरला भन्नाट उत्तर दिले आहे.

सोनू सूदला एका यूजरने ट्विटमध्ये टॅग करत आयफोनची मागणी केली होती. पण सोनू सूदने उत्तर न दिल्याने त्याने पुन्हा त्याला टॅग करत ट्विट केले. ‘सोनू सूद सर, एक आयफोन हवा होता. मी त्यासाठी आतापर्यंत २० वेळा ट्विट केले आहे’ असे त्या यूजरने ट्विटमध्ये म्हटले.

त्याच्या या ट्विटवर सोनू सूदने भन्नाट उत्तर दिले आहे. सोनू सूदने ट्विट करत त्याला पण फोन हवा असल्याचे म्हटले आहे. ‘मला पण एक फोन हवा आहे. त्यासाठी मी २१ वेळा ट्विट करु शकतो’ असे सोनू सूदने ट्विटमध्ये म्हटले आहे. एकिकडे सोनू सूद गरजूंना मदत करत आहे. तर दुसरीकडे अशा अनेक यूजर्सला पण उत्तर देत आहे.

You might also like