‘वॉरिअर आजी’ च्या मदतीला धावला सोनू सूद

सोनू सूद लॉकडाऊनच्या काळात परराज्यात अडकलेल्या कामगारांना आपापल्या घरी जाण्यासाठी मोलाची मदत करत आहे. आतापर्यंत   हजारो कामगारांसाठी सोनू सूद हा देवदूत बनून पुढे आला आहे.या कार्यामुळे सर्वांकडून त्याचे कौतुक केले जात आहे. यातच पुन्हा एकदा सोनुने  सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होणाऱ्या आजींच्या व्हिडियोला शेअर करत या आजीची मदत करणार असल्याचे सांगितले आहे.

सोनुने ट्विट केले आहे की,’एक आजी आपले पोट भरण्यासाठी रस्त्यावर लाठीकाठी खेळताना दिसत आहे. आपलं कौशल्य सादर करत ती पोट भरण्याचा प्रयत्न करत. त्यांचा  बरोबर मी  एक लहान प्रशिक्षण शाळा उघडेल जिथे ती आपल्या देशातील महिलांना काही आत्म-संरक्षणाचे तंत्र प्रशिक्षण देऊ शकेल.’ असं म्हणत सोनुने येत्या काळात प्रशिक्षण सुरु होणार असल्याचे सांगितले आहे.  असं ट्विट करत पोटासाठी रस्त्यावर ‘कसरत’ करणाऱ्या ‘वॉरिअर आजी’ च्या मदतीला सोनू सूद धावला आहे.

दरम्यान, तरुणपणी सीता और गीता शेरणी या हिंदी चित्रपटात काम करणाऱ्या 85 वर्षाच्या आजींना जगण्यासाठी आता मात्र कसरत करावी लागत आहे. शरीर साथ देत नसतानाही त्यावर मात करत या आज्जी तरुणांना लाजवेल अशी ‘कामगिरी’ करतात. या आजींचे नाव आहे शांताबाई पवार पुण्यातील हडपसर परिसरात या आपल्या कुटुंबासह राहतात.

पुण्याच्या हडपसर परिसरात राहणाऱ्या या आजींचे कुटुंब मोठे आहे. घरची परिस्थिती हलाखीची आणि बिकट आहे. त्यामुळे नातवांची खाण्यापिण्याची आबाळ होऊ नये यासाठी त्या लाठीकाठीचे तर प्रात्यक्षिक दाखवत असतात.

आधी त्या रस्त्यावर डोंबाऱ्याचा खेळ सादर करत होत्या. तीन महिन्यांपूर्वी एका खेळादरम्यान त्या खाली पडल्या आणि त्यांच्या हाताला जखम झाली. तेव्हापासून डोंबाऱ्याचा खेळ बंद झाला. परंतु ज्या थांबला नाही रस्त्यावर रात्री एकटीच प्रात्यक्षिक दाखवत त्यातून मिळालेल्या पैशातून सध्या त्यांच्या कुटुंबीयांची उपजीविका चालते. सध्या त्यांच्या घरात सात नातवंड आहेत. घर पत्र्याचं असूनही मिळेल त्या पैशातून त्या नातवंडांना सुखी ठेवण्याचा प्रयत्न करतात.

You might also like