सोनू सूदचा संयुक्त राष्ट्रसंघाकडून सन्मान

सोनू सूदने कोरोना महामारीच्या काळात अनेक स्थलांतरित मजुरांसह तळागाळातील लोकांची मदत करत माणुसकीचे दर्शन घडवले. सोनू सूदच्या या कार्याची दखल आता संयुक्त राष्ट्र संघाने घेतली आहे. युनायटेड नेशन्स डेव्हलपमेंट प्रोग्रामच्या विशेष ह्युमनटेरियन पुरस्काराने सोनू सूदला सन्मानित करण्यात आले आहे
खलनायकाची भूमिका साकारणाऱ्या सोनू सूदने खऱ्या आयुष्यात मात्र नायकाची भूमिका बजावली आहे. स्थलांतरितांना त्यांच्या घरी सुखरूप पोहचवण्यापासून सुरू झालेला त्याचा हा मदतीचा ओघ आता बेरोजगारांना रोजगार मिळवून देण्यापर्यंत येऊन पोहोचला आहे. देशाच्या वेगवेगळ्या भागात अडकलेली मजुरांना, प्रवाशांना सोनूने रेल्वे आणि बसच्या माध्यमातून त्यांच्या घरी सुखरूप पोहचवले.
त्याचवेळी देशाबाहेर अडकलेल्या विद्यार्थांची भारतात येण्याची सोयही त्याने स्वःखर्चातून केली आहे. या विद्यार्थ्यांना भारतात परतण्यासाठी त्याने थेट विमानांची सोय केली. इतक्यावरच त्याचे मदत कार्य थांबले नसून विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी मदत, इतर वैद्यकीय मदत करण्यासाठीदेखील सोनू सूदने पुढाकार घेतला आहे.
सोनू सूदने हा पुरस्कार मिळाल्याबद्दल आनंद व्यक्त केला आहे. ‘हा सन्मान माझ्यासाठी विशेष आहे. यूएनकडून दाखल घेतली जाणे खूप विशेष आहे. मी कुठलीही अपेक्षा न ठेवता आपल्या देशवासीयांसाठी जे काही करता येईल ते केले. संयुक्त राष्ट्र संघाने याची दाखल घेणे आणि याचा सन्मान करणे ही विशेष बाब आहे असे सोनू सूदने म्हटले आहे
उँगली उठाने से नहीं..
उँगली थामने से देश बदलेगा दोस्त 🇮🇳— sonu sood (@SonuSood) September 29, 2020