‘महेश भट्ट यांनी मला चप्पल फेकून मारलं’; कंगनाच्या आरोपावर ‘या’ गायकाची प्रतिक्रिया

कंगना रनौत बॉलिवूडमधील घराणेशाहीविरोधात गेल्या काही दिवसं पासून जोरदार टीका करताना दिसत आहे. ती सातत्याने निर्माता महेश भट्ट यांच्यावर निशाणा साधत आहे. “महेश भट्ट यांनी माझ्यावर चप्पल फेकून मारली होती”, असा खळबळजनक आरोप कंगनाने केला होता.

तिच्या या आरोपांवर गायक सोनू निगम याने प्रतिक्रिया दिली आहे. कंगना सातत्याने आरोप करतेय तर त्यामध्ये काहीतरी तथ्य असेलच, असं मत सोनू निगम याने व्यक्त केलं.एका मुलाखतीत सोनू निगमने बॉलिवूडमधील घराणेशाही आणि कंगनाच्या आरोपांवर भाष्य केलं.

तो म्हणाला, “कंगनाबाबत माझ्या मनात प्रचंड आदर आहे. ती पाठिमागून नव्हे तर तोंडावर बोलण्यात विश्वास ठेवते. तिच्यासारख्या बोल्ड स्टेप घेण्यासाठी हिंमत लागते. गेल्या काही काळात ती सातत्याने महेश भट्ट यांच्यावर आरोप करत आहे. या आरोपांमध्ये नक्कीच काहीतरी तथ्य आहे. घराणेशाहीचा त्रास मला नाही झाला म्हणजे ती अस्तित्वात नाही असा त्याचा अर्थ होत नाही. कंगनाने बॉलिवूडची ही गडद बाजू जगासमोर आणावी यासाठी तिला आमचा पाठिंबा आहे.”

यापूर्वी सोनू निगमने नव्या कलाकारांवर होणाऱ्या अन्यायाविरोधात आवाज उठवला होता. त्याने इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ पोस्ट केला होता.  “अभिनय क्षेत्रात घराणेशाही तर आहेच, परंतु ही परंपरा आता संगीतच्या दुनियेतही सुरु झाली आहे. दिग्दर्शक, निर्माता तयार असतानाही अनेक नव्या कलाकारांना संगीत कंपन्यांच्या मक्तेदारीमुळे काम मिळत नाही. हा प्रकार त्वरित थांबवा अन्यथा आता संगीत क्षेत्रातही आत्महत्या सुरु होतील अशी भीती मला वाटतेय.” असे विचार सोनू निगम याने व्यक्त केले होते.

You might also like