सोनू निगमचे होते अबू सालेमसोबत संबंध…, ‘या’ अभिनेत्रीने केला खुलासा

सोनू निगमने सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येनंतर एक व्हिडीओ शेअर केला होता. या व्हिडीओमध्ये त्याने घराणेशाही तर आहेच, परंतु ही परंपरा आता संगीतच्या दुनियेतही सुरु झाली आहे असे म्हटले होते. सोनुने पोस्ट केलेल्या व्हिडीओमध्ये त्याने गायक अरमान मलिक, अमाल मलिक, निर्माते भूषण कुमार यांच्यावर टीका केली होती. त्यानंतर भूषण कुमार यांच्या पत्नी दिव्या खोसला कुमारने सोनू निगमला चांगलेच सुनावले आहे.

दिव्या खोसला कुमारने एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये तिने टी-सीरिजने अनेक बाहेरुन आलेल्या गायक, म्यूझिक दिग्दर्शक, कलाकारांना संधी दिल्याचे म्हटले आहे. त्यानंतर दिव्याने सोनू निगम यांचे अबू सालेमसोबत संबंध असल्याचे म्हटले आहे.

 

You might also like